स्विमिंग पूलमध्ये तरुणींनी केला डान्स, सोशल मीडियावर Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यस्थान : वृत्तसंस्था – यंदाच्या वर्षी सर्वच समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा होताना दिसत आहे. आता झालेली दहीहंडी असो अथवा गणपती आणि येणारा नवरात्री सुद्धा जल्लोषात साजरा होणार हे या व्हिडिओवरून नक्कीच लक्षात येईल. नवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच हा गरबाचा (garaba) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे.

गणपतीनंतर नवरात्रीच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. बाजारपेठांमध्ये हौशि कलाकार, गरबा प्रेमी चनिया चोळी त्याचबरोबर दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राजस्थान सारख्या राज्यांमध्ये गरबा (garaba) कार्यक्रमांना तर सुरुवातच झाली आहे. आणि हा गरबा साधासुधा नसून चक्क स्विमिंग पूल मध्ये ही लोकं गरबा (garaba) करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो स्विमिंग पूल मध्ये एक गट गरबा (garaba) खेळताना दिसत आहे. एवढेच नाही तर प्रत्येक जण पारंपारिक चनिया चोळी व केडीयू घालून यात सहभागी झालेले आहेत. यात महिलांबरोबर पुरुष ही आपल्याला भन्नाट स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राजस्थानमधील उदयपूर येथील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे.

हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली