हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोंबर 2023रोजी भाविक स्कंदमातेची पूजा करतात. नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमातेला अर्पण करण्यात आला आहे. आजच्या दिवशी महिला पिवळे कपडे परिधान करून स्कंदमातेची उपासना करतात. तसेच, तिच्याकडे कुटुंबामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करतात. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला विशेष मान दिला जातो. त्यामुळे तुम्ही देखील स्कंदमातेची पुजा करत असाल तर तुम्हाला स्कंदमातेविषयी माहित असणे आवश्यक आहे.
स्कंदमातेविषयी माहिती
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमी म्हणजेच “स्कंदमाता” हिची पूजा केली जाते. स्कंदमाता ही कार्तिकेयची (स्कंद) आई होती. म्हणून स्कंदमाता ही दुर्गेचे पाचवे रूप आहे. स्कंदमाता करुणा, मातृत्व आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाचे प्रतिनिधित्व करते. आपल्याला स्कंदमाता सिंहावर स्वार होऊन पिवळे वस्त्र परिधान करून बसलेली दिसते. स्कंदमातेला चार हात आहेत. त्यापैकी एक कार्तिकेयाला आहे. या दिवशी भक्त ‘नकारात्मक विचार’ दूर करण्यासाठी आणि आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी मिळविण्यासाठी स्कंदमाताची पूजा करतात. स्कंदमाता ही सूर्यमालेची प्रमुख देवता असल्याने तिच्या उपासना केल्यास भक्तांना अलौकिक प्रकाश आणि तेज यांचा आशीर्वाद मिळतो.
आजचा रंग
नवरात्रीतील पाचवा रंग हा पिवळा आहे. जो आनंद आणि आशावादाचे प्रतीक आहे. पिवळा रंग प्रसन्नता आणि तेज यांच्याशी देखील संबंधित आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेची मनोभावे पूजा केल्यास देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते.