गडचिरोली प्रतिनिधी / गडचिरोलीमध्ये आज नक्षलवाद्यांनी आणखी एक हल्ला केला. हा हल्ला मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. गडचिरोली येथील जांभीया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर हे कर्मचारी पायी चालत जात असताना हा हल्ला कारण्यात आला.
या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यावेळी या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. गुप्तचर यंत्रणांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र तरीही याठिकाणी नक्षलवाद्यां कडून हल्ला करण्यात आला.
मंगळवारी छत्तीसगडच्या दंतेवाडा परिसरात नक्षलवादी हल्ला केला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवली होती. या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला तसेच गाडीतील चार जवान शाहिद झाले. यानंतर २४ तासाच्या आताच गडचिरोली येथे नाक्षवादी हल्ला करण्यात आला.
इतर महत्वाचे –
‘हे’ उद्योजक माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार …
Big Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी ईव्हिएम यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधा