कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 2 अभ्यासक्रमांना NBA मानांकन

karad government polytechnic collage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेस दि.२८ ते ३० एप्रिल या कालावधीत भेट देऊन पाहणी केली होती. शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलनातील प्रगती, निकालातील सातत्य, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, करियर गाईडन्स, प्लेसमेंट, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे संस्थेबद्दलचे मत अशा विविध मुद्यांवर समितीने पाहणी केली होती.

शासकीय तंत्रनिकेतन, कराड या राज्याच्या ग्रामीण भागातील पदविका अभियांत्रिकी संस्थेस एन.बी.ए. मानांकन मिळणे हा मोठा बहुमान आहे. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. आता एआयसीटीई च्या विविध योजना – अर्थ सहाय्य, संस्थेचे भविष्यातील विकासाच्या योजना ही संस्था नवीन जोमाने पूर्ण करेल, असा विश्वास संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून मानांकन मिळण्यासाठी संस्थेमधील सर्वांनी कष्ट घेतले. या वाटचालीत संचालक डॉ.विनोद मोहितकर, सहसंचालक डॅा. डी.व्ही.जाधव, प्राचार्य डॅा. राजेंद्र पाटील, संस्था एन.बी.ए. समन्वयक डॅा.सीमिकेरी व डॅा.चव्हाण, सर्व विभागप्रमुख व प्रभारी अधिकारी, सर्व कर्मचारी, विद्यार्थी तसेच ज्यांनी यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागास आणि संगणक अभियांत्रिकी विभागास सहकार्य केले.