एनसीसीचे विमान दुर्घटनाग्रस्त; एका पायलटचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक-ऑफनंतरच आज एनसीसीचे एक विमान पंजाबच्या पटियाला येथे दुर्घटनाग्रस्त झाले. हलक्या वजनच्या या विमानातून एका एनसीसी कॅडेटसमवेत ग्रुप कॅप्टन-रँकच्या अधिकाऱ्यानं विमान उड्डाण केले होते. मात्र, विमानाने उड्डाण घेताच काही क्षणातच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेत दुदैवाने एका पायलटचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वायुसेनेने वायुसेनेने वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात विमान चालवत असलेले ग्रुप कॅप्टन जी.एस चीमा यांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर एनसीसी कॅडेटला गंभीर दुखापत झाली आहे. कालच भारतीय नौदलाचं मिग-२९ के हे विमान गोव्याच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात कोसळलं. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत वैमानिक सुरक्षितरित्या विमानातून बाहेर पडल्याने बचावले होते.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. NCC aircraft crashed today in Punjab’s Patiala a

Leave a Comment