इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; कार्यकर्त्यांचे आगळे वेगळे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : वाढत्या इंधन दरामुळे देशात सर्वत्र नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे. तसेच सध्या सगळीकडे आर्थिक परस्थिती कोलमडली असल्यामुळे त्यात इंधन दरवाढ परवडत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या दरवाढीचा परिणाव सर्वच क्षेत्रावर होत आहे. या विरोधात शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले आहे.

औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील मोडवरून तहसील कार्यालयापर्यंत चारचाकी वाहनाला दोरखंडाने बांधून ढकलत आणले आणि ‘मोदी हटाव देश बचाव, पेट्रोल डीझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनानंतर नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी तहसीलदार शोभा पुजारी यांना निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख म्हणाले की, देशात दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अशात भाजीपाल्या पासून किराणा बांधकाम व अन्य सर्व वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्त्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने जगणे कठीण झाले आहे असेही ते म्हणाले.