मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वाय.बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे. विधिमंडळ पक्षनेते पदावरून अजित पवार यांची हकालपट्टी झाल्यानंतर जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून राज्यपालांना भाजपाला पाठिंब्याचे ५४ आमदारांचे जे पत्र अजित पवार यांनी दिले होते त्याची वैधता आता किती राहणार? असा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. सध्यातरी अजित पवार यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे हे नक्की.
Ajit Pawar removed as NCP legislative party leader. pic.twitter.com/14nVbNvVJc
— ANI (@ANI) November 23, 2019