सोलापूर प्रतिनिधी | काल सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादी असल्याचे समोर आले आहे. चक्क राष्ट्रवादीनेच जाहीर केलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात पक्षाने भूमिका घेतली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
करमाळा येथे राष्ट्रवादीने संजय पाटील यांना तर सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अजित पवार यांनी करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट करत करमाळ्यातील अपक्ष उमेदवार संजय पाटील आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केले.
पवारांच्या या स्पष्टीकरणा नंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांची गोची झाली आहे. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्या नंतर करमाळ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील आणि सांगोल्यातील उमेदवार दीपक साळुंखे यांना विचारले असता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि उमेदारांची ऐन निवडणूकीत वेगवेगळी भूमिका असल्याने सर्वसामान्य मतदार ही अचंबित झाले.
ऐकीकडे ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी नेत्याचे भाजप सेनेत इनकमिंग सुरू असतानाच पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्याच विरोधात प्रचार करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
तासगाव मतदारसंघ पुन्हा अनुभवतोय आर आर आबांचा करिष्मा @rohitrrpati @NcpSangli @NCPspeaks
https://t.co/aTWZIbcb5f— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
दोन हजार रुपयांना आम्हाला विकत घेतो काय ? शेतकऱ्याचा सुजय विखेला टोला; दोन हजारांचा चेक पाठवला परत
सविस्तर वाचा- https://t.co/qTAoCIccV9@BJP4Maharashtra @PMOIndia #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
उदयनराजेंना खिंडीत गाठण्यात विरोधक यशस्वी; ‘हा’ उमेदवार रिंगणात आल्याने चुरस वाढली
वाचा सविस्तर –https://t.co/AmQVFI6BAM@Chh_Udayanraje @BJP4India @BJP4Maharashtra #MaharashtraAssemblyPolls #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019