अहमदनगर प्रतिनिधी | महानगरपालिका महापौर निवडणूक नुकतीच पार पडली, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला ऐनवेळी पाठिंबा दिल्या मुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर तिथे निवडून आला. मात्र पक्षाच्या स्थानीक नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपसोबत जाण्याऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार असे पाटील यांनी म्हटले आहे.
‘अहमदनगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत महानगरपालिकेची निवडणूक लढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. सर्व संबंधित नगरसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मी दिले आहेत. या नोटीसांना उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर टिका होत असून आता राष्ट्रवादी सुद्धा शिवसेनेसारखी वागू लागली आहे की काय…? आधी विरोध नंतर पाठिंबा असा प्रश्न आता उपस्तिथ केला जातोय. कालच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुळे येथील मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नीला सरकारने डांबून ठेवले म्हणून सरकारवर जोरदार टिका केली होती. भाजप सरकारने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली असून लोकशाहीची मूल्ये पायी तुडवून अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या या सरकारने हे वेळीच थांबवावे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल, असा इशारा त्यांनी काल भाजपा सरकारला दिला होता. मात्र पक्षाच्या अहमदनगर येथील ह्या दुट्टपी भुमिकेवर जोरदार टिका होत आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?