कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; राष्ट्रवादीची मागणी

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील याना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आज भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे यानिमित्ताने जयंत पाटील यांनी ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी देखील जयंत पाटील यांनी ही मागणी केली आहे.

माझ्या दाढीत जितके केस आहेत तितके बहुजन शिक्षित करेन असा संकल्पच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अखंड ज्ञानदानाचा कार्यक्रम हाती घेतला. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही तसाच उभा आहे आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

कोण आहेत कर्मवीर भाऊराव पाटील

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रास शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुभोज येथे झाला. तर 9 मे 1959 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अवघ्या 72 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here