लक्ष्मण जगतापांची अनोखी दहशत, पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीला उमेदवारच मिळेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण हाच बालेकिल्ला आता राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’, असं म्हणत हिणवू लागला आहे. या ठिकाणाहून अखेरपर्यंत तगड्या उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले, मात्र कोणीही राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही. माजी आमदार विलास लांडे आणि नगरसेवक दत्ता साने यांनी पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा पेच सोडवण्यासाठी अखेरीस पक्षाने विलास लांडे यांना या विधानसभा निवडणुकीला पाठिंबा दिला असून विद्यमान डॅशिंग आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापुढे ते तग धरणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आज (शुक्रवार) अंतिम दिवस होता. भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार झाले नाही. माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष लढण्याचे अगोदरच जाहीर केले होते. तर, नगरसेवक दत्ता साने राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छूक होते. लांडे अपक्ष लढल्यास मतांची विभागणी होईल या याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे लांडे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती.

परंतु, लांडे अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे साने यांनीही अपक्षच अर्ज भरला आहे. पक्षाने देखील अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. शेवटच्या क्षणी पक्षाने लांडे यांना पुरस्कृत केले आहे. लक्ष्मण जगताप या मतदारसंघात मागील १० वर्षांपासून सक्रिय आहेत. पूर्वाश्रमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेल्या लक्ष्मण जगतापांचा जनसंपर्क दांडगा असून त्याची प्रचिती मावळमधून लोकसभेसाठी निवडून आलेल्या श्रीरंग आप्पा बारणे यांनीही घेतली .

Leave a Comment