शिवसेनाप्रमुखांची कामं करतात म्हणुनच एकनाथ शिंदेंकडे आरोग्यमंत्री पद, राष्ट्रवादीची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सोपावण्यात आला. राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडायला आलेली असताना, अनेक सरकारी दवाखान्यांमधे औषधांचा पुरवठा वेळेत होत नसताना शिवसेनेकडून राजकीय सोयीसाठी आरोग्य खात्याचा वापर होत आहे. मुख्यमंत्र्यांची कामं कोण करतं? गिरिष महाजन करतात. तसेच शिवसेनाप्रमुखांची कामं कोण करतात तर एकनाथ शिंदे करतात. आणि त्यामुळेच त्यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाचा कारभार सोपावण्यात आला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी केली

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने नवीन व्यक्तीला ह्या खात्याचा पदभार देणे अपेक्षित होते. परंतू तसे न करता ज्यांच्याकडे आधीच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्या एकनाथ शिंदे यांना हे खाते सोपवले गेले. कोणा इतर नेत्यास अधिभार दिला असता तर शिवसेनेला सत्तेची लालसा आहे अशी टीका झाली असती आणि म्हणून आपल्या राजकीय सोयीसाठी शिवसेनेने हे पाऊल उचलले असे टकले यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेने आरोग्य खात्याचा अतिरिक्त भार एकनाथ शिंदेंकडे दिला आहे. शिवसेना जरी जाहीररित्या भाजपावर टीका करत असली तरी खातेवाटपामध्ये जे मिळालं त्यातच सुखी राहण्याचा त्यांचा पवित्रा आहे. या सगळ्या खेळखंडोब्यात सामान्य जनतेच्या आरोग्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे टकले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. खात्याला पूर्णवेळ देणाऱ्या मंत्र्याची गरज आहे, असे मतही हेमंत टकले यांनी व्यक्त केले आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

 

शिवसेनाप्रमुखांची कामं करतात म्हणुनच एकनाथ शिंदेंकडे आरोग्यमंत्री पद, राष्ट्रवादीची टीका

Leave a Comment