सांगली । ”एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करत तो मतदारसंघ घेतला आणि निवडणूक लढवली. यात पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटीलका यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका केली होती. त्यावर आज जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर टीकास्त्र सोडलं आहे.
चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावं. शरद पवार यांची मापं काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला आहे.
‘ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, असंही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला हाणला.
त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधलंय. एका महिला लोकप्रतिनिधीनं तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.