सचिन आणि लतादीदी ही दैवतं, त्यांची नव्हे भाजप आयटी सेलची चौकशी करणार ; गृहमंत्र्यांचा षटकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलेब्रिटीनी काही ट्विट केले होती. त्यावरून देशभर प्रचंड गदारोळ माजून नागरिकांनी सेलेब्रिटीविरुद्ध रोष व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सोमवारी आपली बाजू स्पष्ट केली. सेलिब्रिटींच्या ट्विटबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी म्हणालो, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, पण माझ्या तोंडी लता मंगेशकर, तेंडुलकर यांची चौकशी करणार अशी वाक्यं घालण्यात आली, असे देशमुख यांनी म्हटले.

माझा आदेश हा भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यासाठी होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? दिल्लीमध्ये आम्ही जी चौकशी केली, त्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि 12 इन्फ्ल्युएन्सरची नावं समोर आली आहेत. त्यांची रितसस चौकशी सुरु असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like