अप्पा.. मला बळ द्या!’ धनंजय मुंडेंची ‘ती’ भावनिक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे म्हणत एक संग्रहित व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून एक भावनिक पोस्ट केली आहे.

”अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात…तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या!” अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे.

येणाऱ्या काळात गोरगरीब-कष्टकरी, वंचित-उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली असेल. तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”