खर्डा किल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज; आमदार रोहित पवारांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच पवारांनी दिलेली माहिती हि सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून 74 मीटरचा मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक आकाउंटवरून नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती पवार यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणाऱ्या देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंच (74 मीटर) अशा भगव्या स्वराज्य ध्वजाचं उपस्थित संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

https://www.facebook.com/220852055045211/posts/1252129188584154/

यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख 74 अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून 15 ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे.हा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे पवार सांगतात.

Leave a Comment