मुंबई । राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत एकमताने तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.
@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 27, 2020
पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. https://t.co/ug3f21o56g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2020
दरम्यान, शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढत ऊसतोड कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते.
.. अन 'त्या' संतप्त शेतकऱ्यानं शेतातील सोयाबीन दिले पेटवून, नुकसान भरपाईचे सरकारचे निकष आले आडव
वाचा सविस्तर -👉 https://t.co/Tq936ZUovA#Farmers #maharashtrarains #maharashtrafluids @CMOMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 28, 2020
'.. असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील'; नितेश राणेंची टीका
वाचा सविस्तर – https://t.co/hhcqzeKqJe@meNeeleshNRane @NiteshNRane @CMOMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 28, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in