ड्रग्ज प्रकरणात जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांच्या घरावर धाड टाकली.सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,’ असं नवाब मलिक म्हणाले.

यामध्ये नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवाब मलिकांच्या जावयाला का अटक?

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment