मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांवर कोणता दबाव आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेणाऱ्या IPS अधिकाऱ्याला धक्काबुक्की pic.twitter.com/k5ocpOz7to
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 2, 2022
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चा दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्याने जे कृत्य केले त्याचा व्हिडिओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) स्पष्ट दिसतंय की हिरव्या शर्टवाला व्यक्ती आयपीएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या घटनेला 24 तास उलटून गेले तरी त्याच्यावर अजून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसत आहे कि, बराच वेळ रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी वाढू लागल्याने पोलीस मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घ्यायला गेले तेव्हा हिरव्या शर्टवाली एक व्यक्ती त्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या मागून आली आणि ती व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेणाऱ्या त्या आयपीएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करु लागली. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर