परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना आज कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे समजत आहे. खान यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आला असून त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. खान यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज दुपारी आलेल्या अहवालामध्ये त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आले. खासदार फौजिया खान कोरोना पॉझिटिव्ह येताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नांदखेडा रोड वर असणाऱ्या खासदारांच्या घरातील इतर व्यक्तींचे तपासणी करण्याचे आदेश काढले आहेत.
तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ते सध्या औरंगाबाद येथे उपचार घेत असून त्यांची तब्येत स्थिर असून सुधारणा होत आहे. त्यात आज दुपारी आलेल्या या बातमीने जिल्ह्यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.