हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतंच मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो निर्णय आम्हास मान्य असेल. असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहीत पवार म्हणाले की, “आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना जास्त ताकद मिळते. जनतेची सेवा जास्त प्रमाणात करता येते. याच करणामुळे जयंत पाटील असे म्हणाले असावेत,” असे स्पष्टीकरण रोहीत पवार यांनी दिले.
अजित पवारांचा पाठिंबा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत छेडले असता त्यांनी जयंत पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’