सुशांत प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणार्यांनी आता तोंड न लपवता माफी मागावी – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्याच केली आहे हे आता सिद्ध झाले आहे.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे. तसंच पोलिसांनी बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

रोहित पवारांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणले की , “बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी,” .तसंच त्यांनी आपल्या ट्वीटनंतर सत्यमेव जयते असंही लिहिलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like