राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी राज्य सरकारने जाहीर केली नियमावली; ‘असे’ आहेत नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार्स सुरु करण्यासाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचे पालन करुन आस्थापने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

काय आहे नियमावली?
१)प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. तापमान, सर्दी, खोकला.
२)लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा.
३)हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी.
४)कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
५)ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.
६)कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
७)प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी.
८)शक्यतो पैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे.
९)वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत राहवे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी.
१०)ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.
११)सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
१२)मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.
१३)एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.
१४)दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे.
१५)वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
१६)हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.
१७)मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment