संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले.

निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर, रश्मी बागल, जयदत्त क्षीरसागर अशा नेत्यांनी खांद्यावर भगवा झेंडा घेत आधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यात आता संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत भर घातली आहे. पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खूप दिवसापासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. त्यांच्या प्रवेशाने अशा चर्चाना आता विराम लागला आहे. पाटील यांच्या प्रवेशावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती.

पाटील ईशान्य मुंबई मतदारसंघातून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी होत लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तर २०१९ मध्येही त्यांचा भाजपाच्या मनोज कोटक यांनी पराभव केला आहे. असे जरी असले तरी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात संजय दिना पाटील यांचा प्रभाव असल्याने विधानसभा निवडणुकीत याचा शिवसेनेला फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. .