राणेंच्या ‘त्या’ दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली, म्हणाल्या की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती,’ असा दावा नारायण राणे यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत केला होता. राणेंच्या या दाव्याची राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र खिल्ली उडवली आहे. राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.

राणे कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नाही, असं त्या म्हणाल्या.

यापूर्वी जयंत पाटलांनीही फेटाळला होता राणेंचा दावा

जयंत पाटील यांनी आधीच राणेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. ‘मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्यानं माझ्या मनाला असा विचार कधी शिवतही नाही. भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली नव्हती आणि राणे यांची गणती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होत नाही हे जाणून खेद वाटला. माझी नेमकी कुठल्या नेत्याशी, कुठं चर्चा झाली होती याचा तपशील कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल,’ असं ते म्हणाले होते.

नक्की काय म्हणाले होते नारायण राणे –

आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’