Saturday, March 25, 2023

“अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर…”; नितेश राणेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

- Advertisement -

मुंबई । शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असं मनाला वाटतं राहतं, अशा शब्दांत सकपाळ यांनी अजानचं कौतुक केलं आहे. सकपाळ यांच्या या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे. नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं. याचदरम्यान आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल,’ असं सकपाळ यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’