हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या दोन्ही मतदारसंघात भाजपला खिंडार पडलं असून महाविकास आघाडीच्या एकीच्या बळाने भाजपला दारुण पराभव पहावा लागला. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानले. दरम्यान, हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2020
“या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’