केंद्र सरकारने खतांच्या किमतींत वाढ केल्याने, राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

Jayant Patil
Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | देशात निवडणूका संपल्यानंतर महागाईचा बोझा सामान्य नागरिकांवर केंद्र सरकार लादत आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना आता खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. प्रचंड प्रमाणात खतांच्या किमती वाढविण्याचा पापं भाजपने केलेले आहे. याचा निषेध म्हणून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर बोझा लादणाऱ्या भाजपचा निषेध करण्यासाठी आंदोलन हातात घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हि दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनातून करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच हि दरवाढ लादून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या निवडणूका संपन्न झाल्यानंतर केंद्र सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवण्यास सुरवात केली आहे. देशात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोलचे दर हे शंभर रुपयांपर्यंत गेले आहेत. अशातच केंद्र सरकारने देशवासियांना दुसरा धक्का दिला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. १०२६२६ या खताची ची किंमत ६०० रुपयांनी वाढली असून आता ५० किलोचे पोते १७०० रुपयांवर गेले आहे. डीएपीची किंमत ७५० रुपयांनी वाढली जो ११८५ रुपयांना मिळत होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे, पोटॅशची किंमत ही वाढली आहे. प्रचंड प्रमाणात खतांच्या किमती वाढविण्याचा पाप भाजपने केलेले आहे.

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर बोझा लादणाऱ्या भाजपचा निषेध करण्यासाठी आंदोलन हातात घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हि दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी असणार आहे. देशातील शेतकरी आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला आहे. हि दरवाढ लादून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्याचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.