राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाचा खून; सोलापुरात खळबळ

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपालिकेच्या मतदार यादीतील बनावट नावांवर हरकत आणि घरकुलांच्या गहाळ फायलींवरून केलेल्या आंदोलनाचा राग मनात धरून दुचाकीला पाठीमागून टेम्पोची धडक देऊन एका शिवसैनिकाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांचे पती संतोष सुरवसे यांच्यासह चार जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री 11 च्या सुमारास शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. सतीश क्षीरसागर असे मृताचे नाव असून त्याचा सहकारी विजय सरवदे हा गंभीर जखमी आहे. दरम्यान,मृत सतीश क्षीरसागरचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घातपात झाल्याने गुन्हा दाखल होईपर्यंत मार्तंडेह ताब्यात घेतला नव्हता, अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 18 तासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला त्यामुळे कांहीवेळा मोहोळ शहरामध्ये तणावाचं वातावरण होत.

दरम्यान,मोहोळ नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. शहरातील राजकारणात मात्र कार्यकर्त्यांचा संघर्ष चालूच होता. या घटनेमुळे मोहोळ शहरासह पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.