हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे निवडणूकांच्या तोंडावरच शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सह कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.
आजघडीला राज्यात राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार आहेत. तसेच राज्यात 54 आमदार असून नागालँडमध्ये त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा दर्जा रद्द केल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
Aam Aadmi Party (AAP) is recognized as a national party. The status of NCP, CPI and AITC as a national political party has been withdrawn. NCP and AITC will be recognized as state parties in Nagaland and Meghalaya respectively: Election Commission of India pic.twitter.com/o6SDuhDFdg
— ANI (@ANI) April 10, 2023
BREAKING
खर तर कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी निवडणूकीत एकूण मतांपैकी 6 टक्के मतांची आवश्यकता असते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित अस यश मिळाले नाही आणि त्यांची मतांची टक्केवारी घसरली अस म्हंटलं जातंय. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.