राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात ‘एनडीए’ च्या १३५ व्या तुकडीचा शानदार दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला

NDA Passing out Parad
NDA Passing out Parad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३५ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली.

सकाळच्या थंडीत ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी ०७:१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमुन गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन झाले. संचलन बघण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक नातेवाईक यांच्याकडून त्यांचे हे क्षण टिपले जात होते.

यावेळी हेलीकॉप्टर, सुखोई व मिग विमानांचे ‘फ्लाय पास्ट’ झाले. प्रचंड ऊर्जा भरलेल्या ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला.