NDRF कडून कराडच्या विद्यार्थ्यांना पूरस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण

NDRF training students of Karad on flood management
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड व परिसराला 2019 मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने कराड येथील कृष्णा नदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनेचे प्रात्यक्षिक सादर करून जनजागृती केली.

संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने प्रीतिसंगमावरील कृष्णा नदी काठी आपत्ती निवारणासंदर्भातील प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी आपत्ती काळात मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव कसा करावा, पुरात बुडणाऱ्यांना पोहून कसे बाहेर काढावे, बोट कशी चालवावी आदींची माहिती आपत्ती दलाच्या जवानांनी दि. का. पालकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही दिली. यावेळी जवानांनी बोटीतून विद्यार्थ्यांना नदीपात्रात फिरवून थेट प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले.

या वेळी निवासी नायब तहसीलदार युवराज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कुंभार, मंडल अधिकारी महेश पाटील, जे. बी. बोडके, डी. सी. दीक्षित, आर. आर. ढाणे, युवराज काटे, एन. जे. मर्ढेकर, श्रीमती एस. एस. थोरात, पोलिस उपनिरीक्षक आर. पी. पुजारी यांच्यासह पालिकेचा अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, तलाठी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.