Neem Benefits | कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. कडुनिंबाचे झाड, त्याची पाने, फळे, फांद्या सगळ्याच खूप औषधी असतात. त्यामुळे प्राचीन काळापासून कडुलिंबाला खूप महत्त्व आहे. अनेक लोक कडुलिंबाचा वापर करतात. केवळ आरोग्यासाठीच नाही, तर केस आणि त्वचेसाठी देखील कडुलिंबाचा खूप मदत होते. कडुलिंबामध्ये एंटीबॅक्टरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे त्वचेला आणि केसांना संसर्गापासून वाचवतात. कडूलिंबाची (Neem Benefits) पाने, साल आणि बिया ही तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात वापरता येते. जसे की कडुलिंबाचे तेल बनवता येते. कडूलिंबाची पेस्ट बनवता येते. याचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला त त्वचा आणि केसांसंबंधित अनेक फायदे मिळतील. आता ते कोणते फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
त्वचा संक्रमण दूर होते | Neem Benefits
कडुनिंबातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे याचा उपयोग पिंपल्स, एक्जिमा आणि डागांवर होतो. कडुलिंबाची पेस्ट बनवून लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.
त्वचेतील पाणी धरून ठेवतात
कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे कोरडी आणि तेलकट त्वचा मऊ आणि तेलमुक्त ठेवण्यास मदत करतात. हे त्वचेतील अतिरिक्त सीबम काढून टाकते आणि छिद्र उघडते, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.
अँटी-एजिंग गुणधर्म
कडुलिंबात व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स आणि अल्डीहाइड्स असतात जे त्वचेला नेहमी तरुण ठेवण्यास मदत करतात.
सूज कमी होते
कडुलिंबाची पाने आणि तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ, सूज आणि खाज सुटते.
केसांसाठी फायदेशीर | Neem Benefits
कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केस गळणे कमी होते आणि ते मजबूत होण्यास मदत होते.
कोंडा समस्या दूर होते
कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केसांची खाज किंवा कोंडा ही समस्या दूर होते. याशिवाय, हे केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ आणि चमकदार बनवू शकते.