JEE आणि NEET परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येईल परीक्षा केंद्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । JEE (main) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत. आता NEET-UG-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात NTAने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कोरोना काळात प्राधान्याने त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रांचा पर्याय निवडावा लागला. NTAने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या आधारे परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.

परीक्षांची अधिकृत माहिती देताना NTAने सांगतिलं की, JEE आणि NEET परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. JEE परीक्षा केंद्राची संख्या 570हून अधिक वाढवून ती 600 करण्यात आली आहे. तर NEETच्या परीक्षेसाठी क्रेंद्रांची संख्या 2546 वरुन 3843 करण्यात आली आहे. JEE (main) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. JEE ऍडव्हान्सची परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. याआधी JEE परीक्षा 18 जुलै ते 23 जुलै आणि NEETची परीक्षा 26 जुलै रोजी होणार होती.

JEE आणि NEET या स्पर्धा परीक्षांमध्ये 27 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. आपल्या जवळच्याच केंद्रात परीक्षा देण्याची सुविधा केल्यामुळे, कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी इतर शहरांमध्ये जावं लागणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”