प्रजासत्ताक दिन विशेष | 26 जानेवारी इतिहासात यासाठी महत्वपूर्ण आहे कारण भारताचं संविधान याच दिवशी अस्तित्वात आले आणि भारत एक गणतंत्र देश बनले. भारताचे संविधान लिहले गेलेलं सर्वात मोठ संविधान आहे. संविधान निर्माण प्रक्रिया 2 वर्षे, 11 महिने व 18 दिवस लागले.
भारतीय संविधानाचे वास्तुकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विश्वातील अनेक चांगला संविधानातुन चांगले लक्षणे यात आत्मसाद केले. भारताची राज्यघटना समितीने 26 नोव्हेंबर, इ.स. 1949 रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. 1950 रोजी अंमलात आली.
जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी इ.स. 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगाफडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.26 जानेवारी, इ.स. 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. याच दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी शपथ ग्रहण केलीं होती.
इतर महत्वाचे –
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
आणि भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आली
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक