देव म्हणजे फॅशनचे साधन नव्हे…! देवीच्या प्रतिमेचा जॅकेट म्हणून वापर करणाऱ्या अभिनेत्रीवर संतापले नेटकरी

Priyanka Chopra - Jonas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक कलाकार आपल्या स्टायलिश लूक आणि ते परिधान करण्याच्या अंदाजामुळे लोकप्रिय आहेत. तर काहीजण त्यांच्या अश्याच अनोख्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत असतात. सेलिब्रेटी नेहमीच स्टायलिश आणि फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या चित्र विचित्र गोष्टी करताना दिसतात. मात्र हीच बाब कधी कधी त्यांच्या चांगलीच अंगलट येते. बॉलिवूडची पिग्गी चॉप्स सध्या अशाच काहीश्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच प्रियंका चोप्रा- जोनास ने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने काली मातेची प्रतिमा असणारे जॅकेट परिधान केले आहे. यामुळेच ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. हा फोटो पाहून लोक भडकले आहेत. प्रियंका चोप्राने देवाचा अपमान केला असल्याचे म्हणत नेटकरी तिच्यावर टीका करीत आहेत.

https://www.instagram.com/p/COrsXzahvl9/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोमध्ये प्रियंकाने परिधान केलेले जॅकेटमुळे प्रियंकाला चाहत्यांच्या उग्र समीक्षांसह त्यांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. प्रियंकाचा हा फोटो नीट पाहिला तर काली मातेची प्रतिमा असणारे जॅकेट तिने परिधान केल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटीझन्सचा संताप अनावर झाला. देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे फॅशनसाठी वापर केल्यामूळे नेटकरी प्रियंकावर संतापले आहेत. हा फोटो जोनास ब्रदर्सचे गाणे ‘सकर फॉर यू’च्या शूटिंग दरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/CHMsmfoB6yp/?utm_source=ig_web_copy_link

प्रियंकाच्या या जॅकेटमुळे भारतीय प्रेक्षक वर्गाच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर केला जातोय. म्हणून सोशल मीडियावर प्रियंकाला नेटकऱ्यांची टीकेने झोडपून काढले आहे. कुणी म्हणतय देव म्हणजे फॅशनचे साधन नव्हे.. तर कुणी म्हणतय हीच डोकं ठिकाणावर आहे का? तर कुणी तिला सांगू पाहतंय कि बाई ग देवांच्या प्रतिमा फॅशन म्हणून वापरायच्या नाहीत.

https://www.instagram.com/p/CLN-ahfBRBT/?utm_source=ig_web_copy_link

मुख्य म्हणजे ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रियंका जिला देशी गर्ल म्हणतात ती असं कास वागू शकते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रियंका अनेकदा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल होत असते. तिच्या सोशल मीडियावर तुम्ही नजर टाकल्यास विविध अंदाजातील तिचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय बोल्ड लूक असलेले ड्रेस परिधान करताना ती नेहमीच दिसते. आधी कधीही तिने देवांच्या प्रतिमा फॅशनची वापरल्या नव्हत्या. मात्र तिचा हा लूक पाहून अनेकांना धक्काच बसला होता.