कौनसा नशा किया था? रनिंग ट्रॅकवर मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा फोटो पाहून वैतागले नेटकरी

Late Milkha Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिकडच्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये रीअल लाइफ हिरोंच्या आयुष्यावर बायोपिक स्वरूपातील अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले. यामुळे त्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. असाच एक बायोपिक चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. ज्याने भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्या कार्याला अमरत्व दिले. या बायोपिकमध्ये फरहान अख्तर या अभिनेत्याने फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांची भूमिका अत्यंत हुबेहूब आणि सुंदर साकारली होती. पण असे दिसत आहे की, त्याची ही भूमिका इतकी चांगली ठरली कि उत्तर प्रदेशातील नोएडा स्टेडियममध्ये खऱ्या मिल्खाऐवजी रील मिल्खाचाच फोटो जॉगिंग ट्रॅकवर लावला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. शिवाय नेटकरीसुद्धा स्टेडियमच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत.

ट्विटरवर अनिशा दत्ता यांनी हा फोटो त्यांच्या अकाऊंटवरून २० जून २०२१ रोजी शेअर केला होता. यात नोएडा स्टेडियमवर मिल्खाजींच्या जागी फरहान अख्तरचे चित्रपटातील चित्र चालू असलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला लावण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर दत्ता यांनी ट्विटरवर लिहिले कि, नोएडा स्टेडियम अधिकाऱ्यांना धावण्याच्या मार्गावर असलेली ही फलके बदलण्याची विनंती करेन. वास्तविक मिल्खा सिंग यांच्या चित्राची नोंद घ्या. त्यांच्या ऐवजी चित्रपटातील फरहान अख्तरच्या भूमिकेची नोंद घेणे योग्य नाही. या ट्विटमुळे नोएडा स्टेडियम अधिकाऱ्यांची चूक पाहून सोशल मीडियावर अनेक जण हसू लागले तर अनेकांनी याबाबत राग व्यक्त केला आहे.

 

तथापि, मिल्खा सिंग यांच्या अमूल्य वारशाची थट्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकांनी रोष प्रकट केला आहे. एका युजरने तर चक्क, अरे ओ भाई कौनसा नशा किया था? असे म्हणत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. तर एका युजरने हे बरोबर नाही, रील लाईफ हिरो यास्कारित पात्र नाही. त्यामुळे या ठिकाणी रियल लाईफ हिरोच असायला हवा.

यानंतर मात्र अधिकाऱ्यांना जाग आल्याने त्यानी हि चित्रे हटवून या ट्विटवर पुन्हा रिट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, या प्रतिमा बर्‍याच वर्षांपूर्वी ठेवल्या होत्या. त्या आज काढल्या आहेत आणि आता त्या पुन्हा रंगवल्या जातील.