‘उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठेही म्हटलं नाही’- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका वार्तालापात चव्हाण यांनी कोरोनानंतरच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे,’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना खुलासा करत चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळून लावली. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमी पडतंय असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी केवळ मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता. प्रसारमाध्यमांनी माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीनं मांडलं असा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे . नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठंही म्हटलेलं नाही. प्रशासकीय व्यवस्थेवर मी जरूर बोललो होतो. अनेक अधिकाऱ्यांकडं कुठलीही जबाबदारी नाही तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. असं न करता प्रत्येकाला जबाबदारी द्यावी, असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना दिला होता. हे ताबडतोब व्हायला हवं, असंही मी म्हटलं होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे. ते कुणीही ऐकावं आणि निष्कर्ष काढावा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत याची आम्हाला सर्वांनाच काळजी आहे. एक लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणून हे कसं आटोक्यात येणार याची काळजी मलाही आहे. त्या काळजीतून मी काही बोललो असेन तर त्यातून कुणी कमी पडतंय असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. खरंतर आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment