हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यावरून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर अनेकजण करतात. त्यामुळे पुण्यात असलेल्या बसस्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परंतु आता ही गर्दी तुम्हाला कमी होताना दिसणार आहे. कारण पुण्यात अजून एक बस स्थानक उभारले जाणार आहे.
कुठे बांधले जाणार बस स्थानक?
शिवाजीनगर येथे असलेले पहिले बस स्थानक पाडून आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र तरीही तेथे बस स्थानक उभारण्यात आले नाही. मेट्रोच्या कामासाठी हे स्थानक पाडण्यात आले होते. आता मेट्रोचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र तरीही स्थानक निर्मिती नाही. वाकडीवाडी येथील स्थानकात जाण्यासाठी ते अडवळण पडते. असे पुणेकर म्हणतात. त्यामुळे आता शिवाजीनगर येथे पुन्हा नव्याने बस स्थानक उभारले जाणार आहे.
महा मेट्रो करणार खर्च
शिवाजीनगर येथील बस स्थानक उभारण्यासाठी अनेकजन वाट बघून आहेत. आता त्यास मुहूर्त लागला असून या स्थानकासाठी लागणार खर्च महा मेट्रो स्व खर्चाने करणार आहे. या स्थानकाच्या डिझाईनचे काम वास्तुविशारद शरद प्रभू यांच्या हस्ते केले जात आहे. तसेच हे डिजाईन पुढच्या आठवड्यात सादर केले जाणार असल्यामुळे पुणेकरांच्या नवीन बस स्थानकाबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत.
काय आहे विशेषता?
हे नवीन स्थानक बांधल्यानंतर येथील प्रवाश्यांना मेट्रो, बस आणि रेल्वे अश्या सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे बांधकाम कधी सुरु होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाश्यालाही ते सोयीचे होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
का पाडण्यात आले होते बस स्थानक?
पुण्यात मेट्रो सुरु व्हावी असे सगळ्यांनाच वाटत होते. मेट्रो सुरु झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या दूर होईल असे सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथील 3700 चौरस मीटरपेक्षा अधिक मोठे असलेले बस स्थानक पाडण्यात आले आहे. त्यामुळे तेथे नवीन बस स्थानक उभारले जाईल असे सगळ्यांना वाटू लागले. परंतु सरकारचा यामध्ये हस्तक्षेप झाला आणि याठिकाणी एक संकुल बांधायचे ठरले. मात्र याबाबत ठोस निर्णय न झाल्याने हा प्रकल्प अडखळून राहिला. हे बस स्थानक पाडल्यामुळे वाकडीवाडी येथे ते वळवण्यात आले.