हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे आपल्यातील प्रत्येकालाच वाटतं असते. मात्र अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे लोकांना ते सुरु करता येत नाही. मात्र आज आपण एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे कोणत्याही गुंतवणूकीशिवाय दरमहा हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल. मात्र हे लक्षात घ्या कि, या व्यवसायासाठी आपल्याला आधीपासूनच थोडीफार तयारी करावी लागेल. तर आज आपण टॅक्सी सर्व्हिसच्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत.
आता आपल्या मनात असा प्रश्न डोकावला असेल की कोणत्याही गुंतवणुकीशिवाय हा व्यवसाय कसा सुरू करता येऊ शकेल. चला तर मग एकही पैसा न गुंतवता टॅक्सी सर्व्हिस कशी सुरू करावी आणि याद्वारे दरमहा हजारो रुपयांचे उत्पन्न कसे कमवावे ते जाणून घेउयात…
सर्वात आधी करावे लागेल ‘हे’ काम
टॅक्सी सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला कमर्शिअल वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागेल. त्यासाठी एक सामान्य चाचणी द्यावी लागेल, जी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला कमर्शिअल लायसन्स मिळेल. यानंतर आपल्याला कंपनीसाठी नोंदणी करावी लागेल. ती प्रायव्हेट लिमिटेड किंवा प्रोप्रायटर फर्म असू शकेल.New Business Idea
आता या व्यवसायासाठी टॅक्सीची गरज लागेल. आजकाल जवळपास प्रत्येक बँकेकडून टॅक्सी सर्व्हिससाठी व्हेईकल ऑन रोड फायनान्स केला जातो आहे. या सुविधेचा लाभ घेता येईल. मात्र, टॅक्सीसाठी घेतलेली कार आपल्या कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड असेल आणि त्यासाठी गॅरेंटरचीही आवश्यकता लागेल. New Business Idea
किती EMI द्यावा लागेल ???
जर आपण एखाद्या कारसाठी 8 लाख रुपयांपर्यंत फायनान्स घेतले तर 7 वर्षांच्या कर्जाच्या कालावधीसाठी त्याचा EMI 15,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहून जास्त असू शकेल. हे पूर्णपणे बँकेवर अवलंबून असू शकेल. New Business Idea
किती कमाई होईल ???
या व्यवसायासाठी आपण ओला किंवा उबेरशी करार देखील करता येईल. त्याचप्रमाणे आपण स्वतः देखील हा व्यवसाय सुरु करता येईल. सध्या बाजारात टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर दर 10 रुपयांपर्यंत सुरू आहे. जर आपण एका महिन्यात 6 ते 7 हजार किमी. टॅक्सी चालवली तर महिन्याला 70 हजार रुपये आरामात मिळू शकतील. यासोबतच रात्रीचे ड्रायव्हिंग आणि वेटिंग चार्जेसही वेगळे असतील. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Honda SP125 ही बाईक भारतात 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च, पहा किंमत अन् फीचर्स
Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट
Business Idea : राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या