• Privacy Policy
  • Contact Us
Monday, August 8, 2022
  • Login
Hello Maharashtra
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
Hello Maharashtra
No Result
View All Result
cropped-Screenshot_20220717-171207.jpg

Shweta Tiwari साडीत दिसते खूपच HOT; हे फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही ती आज्जी आहे

cropped-Screenshot_20220714-224651__01.jpg

मोदींनी गुपचूप केलं अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत लग्न? हे फोटो होतायत व्हायरल

cropped-Screenshot_20220706-211907.jpg

अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहिलात काय?

cropped-IMG_6108.jpg

या कारणांसाठी आहेत डाळिंब खाण्याचे फायदे

IMG_6100

सिताफळाचे 6 आरोग्यदायी फायदे ....

cropped-IMG_6098.jpg

चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.....

cropped-IMG_6097.jpg

किवीचे हे 6 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का ?

cropped-images-14.jpeg

पपई खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे !

9B16C21C-9EA7-4A0D-9F7D-A5EAE16F8651

अमृताचा साडी मध्ये नवीन फोटोशूट; पहा भन्नाट फोटोज्.

cropped-700BFC1F-F720-4CF4-B615-D45B5A12499A.jpg

क्रिती सेनॉनचा साडी मध्ये नवीन फोटोशूट...

D56B093B-5620-446C-8E9C-A4B44330482E

रश्मीका चा साडी मधील किलर लुक पहाच....

37D345FE-E267-41AF-8B5B-6E0E9DE6AC7A

शिवालिक ओबरॉय चा सिम्पल लुक पहाच .....

C6622742-3DC5-46CE-9804-B3CB8C59C4B0

हिना खानची कातिलाना अदा पहाच .... .

DF47E570-65CF-4397-A507-7E13457C8F73

अवनीत चा दुबई मध्ये वीकेंड एन्जॉय....

cropped-IMG_5988.jpg

पांढरा शुभ्र मुळा खा आणि विविध आजारांपासून सुटका मिळवा; जाणून घ्या फायदे

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली होणार

shekhar singh
byVishal Patil
September 30, 2021

सातारा : जिल्ह्यात कोव्हिड-१९ ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अद्यापही कोविड ताण आढळून येत असल्याने साथरोग अधिनियम, १८५७ च्या खंड २ नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती ने संपूर्ण राज्यासाठी निर्देश पारित केलेले आहेत. त्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ पासुन खुली करण्यासाठी खाली नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून शेखर सिंह जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी परवानगी दिली आहे.

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात, अशा ठिकाणी आवारात काहीच -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. या आदेशामध्ये कोकोड -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यातस परवानगी असेल. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, धर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना –

६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे, धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.
या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी ६ फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान – ४० ते ६० सेंकदापर्यंत) बंधनकारक असेल, त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हण्ड सॅनिटायझर चा वापर ( किमान २० सेंकदापर्यत) करावा. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक,कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा.

सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी खालील प्रमाणे उपाययोजना करतील.

सर्व धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सनिटायझर डिस्मेंसर तसेच थर्मल सिक्रनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. धार्मिक/ प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी , मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (NoMask-No Entry). सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्स च्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोहीड -१९ विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या व प्रसारित केल्या जाव्यात. धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबत अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे, त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक व प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ,अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे. चप्पल, बुट, पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत. वाहन पाकिंगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे. धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने स्टॉल, कैफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळ सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. धार्मिक व प्रार्थना स्थळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किंग करावे. भाविक, अभ्यागतासांठी धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान ६ फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धामिक प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल. धार्मिक – प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी योणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत.

धार्मिक – प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकूल यंत्र, वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान २४° C ते ३०” C पर्वत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता ४०-70% पर्यत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा,क्रॉस व्हेंन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी. पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना सर्श करण्यास परवानगी असणार नाही. धार्मिक-प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ति संगीत, गाणी वाजविली जावीत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणा-या व्यक्तींना परवानगी देणेत येवू नये, एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा. धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, जमखाना वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.धार्मिक – प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे, धार्मिक – प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकान्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतुकीकरण केले जावे, धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी. अभ्यागत, भाविक, सेवेकरी,कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्लेवाट लावली जात आहे याची दक्षता घेण्यात याबी. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर येणे अगोदर तसे आठवड्यातून एकदा कोहीड-१९ चाचणी करणे आवश्यक असेल. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक असेल. प्रत्येक धार्मिक – प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल,
आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलपमाणे कार्यवाही करावी
आजारी व्यक्तीला इतरापासून दूर असे स्वंतत्र खोलीन किंवा जागेत ठेवावे. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क, चेहरा पट्टी वापर करणे बंधनकारक असेल. तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल, क्लिनिक) केंद्रात कळवावे, तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनास कळवावे. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT, उपचार करणारे तज्ञ) सदर रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. रुग्ण कोविड-१९ विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आल्यास सर्व परिसर निर्जतुकीकरण करण्यात यावा.

सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचेकडून वर नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देणेत येत आहेत.कोविड -१९ व्यवस्थापनासाठी शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत यापूर्वी विहित केलेले व वेळोवेळी देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहोता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

in आरोग्य, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, प. महाराष्ट्र, ब्रेकिंग, महाराष्ट्र, मुख्य बातम्या, सातारा
Tags: Collector OrderOpenReligious placesSatara

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था

by Ajay Ubhe
August 8, 2022
0

इंदूर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील महू येथे कावड यात्रेदरम्यान विजेच्या धक्क्याने (electric current) एका कावड यात्रीचा मृत्यू...

Read more

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात

August 8, 2022

Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

August 8, 2022

पॉवर पेट्रोलमुळे खरंच गाडीच्या ऍव्हरेज मध्ये फरक पडतो?? चला जाणून घ्या

August 8, 2022

सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर

August 8, 2022
Next Post

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवकांना 'कोर्ट उठेपर्यंत' शिक्षा व दंड

  • Privacy Policy
  • Contact Us

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories

© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल.
हिना खानची कातिलाना अदा पहाच …. .
हिना खानचा हॉट अंदाज पहा …..
हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक.
स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…