हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात सगळीकडे हाहाकार माजून सोडला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तर, मेडिकल आणि इतर व्यवस्था कोलमडून पडली आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवस्थापनामध्ये निवांतपणा पाहायला मिळत आहे. औषधांचा तुटवडा, ऑक्सीजनची कमतरता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण प्रक्रिया लागलेला ब्रेक! यामुळे सरकार करोनाच्या बाबतीत किती गंभीर गंभीर आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशाच अवस्थेमध्ये सध्या आंध्र प्रदेशामध्ये करोनाचा नवा आणि आतापेक्षा पण 15 पट जास्त धोकादायक असा नवीन स्ट्रेन सापडला आहे. यामुळे सर्वांनी आता खूप काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.
या घातक आणि धोकादायक स्ट्रेनला (AP) एपि स्ट्रेन आणि (N440K) स्ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्लूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांच्यामते हा खूप धोकादायक स्ट्रेन असून यामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी दुसऱ्या लाटेतील करोना साखळी तोडणे खूप गरजेचे झाले आहे. जर हि साखळी थांबली नाही आणि यामधून एपि स्ट्रेनचा विषाणू फोफावत गेला तर, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये अजून जास्त प्रमाणात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे शासनाने आणि जनतेने वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
हा स्ट्रेन आंध्र प्रदेशामध्ये आढळून आला आहे. सध्याच्या करोना वायरस पेक्षा पंधरा पट जास्त धोकादायक असलेला हा वायरस स्ट्रेन संक्रमित रुग्णांना तीन ते चार दिवसात सिरीयस करत आहेत. यावेळी चार दिवसांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागू शकते. हा नवीन स्ट्रेन तरुण आणि लहान मुलांना लवकर संक्रमित करत आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नुल या भागामध्ये प्रथम यास ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत.