खळबळजनक! लस न देताच डॉक्टरने दिले 80 बोगस लस प्रमाणपत्रे

vaccine

औरंगाबाद – महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. बोगस रुग्णांचे प्रकरण गाजल्यानंतर आता बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झालेली नसताना उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याने प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बोगस प्रमाणपत्राची चौकशी केली असता, तब्बल 80 जणांनी … Read more

शहरातून कोरोना हद्दपार!

Corona

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पळवून लावण्यात काल औरंगाबादकरांना यश आले. दिवसभरात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. काल दिवसभरात 194 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मागील दोन वर्षांमध्ये शुन्य रुग्ण संख्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात आता सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 48 आहे. 15 एप्रिल … Read more

लसीकरण कमी असेल तर डॉक्टरांवर गुन्हे

औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी. तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत सांगितले. जिल्हा … Read more

लस न घेणारे हजारावर नागरिक कोरोनाबाधित

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार 340 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात … Read more

जिल्ह्यात किशोरवयीन मुलांचे केवळ 15 टक्केच लसीकरण

औरंगाबाद – जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून 12 दिवस होवून गेल्यानंतर केवळ 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 मुलांपैकी केवळ 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान … Read more

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनारुग्ण 500 च्या पार

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 540 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 423 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 117 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

औरंगाबाद – कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले. … Read more

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे … Read more

पहिल्या दिवशी जिल्ह्यात 6 हजार मुले लसवंत

औरंगाबाद – केंद्र सरकारने काल पासून 15 ते 18 वर्षाच्या तरुणांना कोरणा प्रतिबंधक लस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादेतही कालपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल 6 हजार 194 मुलांचे लसीकरण करण्यात आले. या योजनेचा प्रारंभ पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गारखेडा येथील प्रियदर्शनी विद्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार अंबादास … Read more

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ

औरंगाबाद – लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more