ST च्या ताफ्यात नव्या ई- बसेस दाखल

E Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर करणारे अनेक लोक आहेत. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार प्रमाणे इलेक्ट्रिक बसची चर्चा सुद्धा जोरदार सुरु होती. आता त्यास पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता ST च्या ताफ्यात ई – बसेस दाखल होणार आहेत. या बसेस किती आहेत? कश्या आहेत? याबाबत जाणून घेऊयात.

एकूण 20 बसेस असतील

ST प्रवाश्यांना सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा कश्या करता येतील याकडे जास्त लक्ष दिले जाते. म्ह्णूनच आता ST च्या ताफ्यात एकूण 20 बसेस दाखल होणार आहेत.मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. त्यामुळे यामध्ये एसटी महामंडळ 5150 ई – बस भाडेतत्वावर घेणार आहेत. त्यापैकी  2350 मिडी बसेस आणि 2800 मोठ्या आकाराच्या ई-बसेस घेण्यात येणार आहेत.

टप्याटप्याने 2 वर्षात दाखल होणार ST महामंडळात ई – बसेस

ST महामंडळाच्या ताफ्यात 5150 एवढ्या बसेस समाविष्ट करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. आता त्यापैकी डिसेंबर महिन्यात 20 बसेस दाखल होणार आहेत. तर बाकी बसेस टप्याटप्याने म्हणजेच पूढच्या दोन वर्षात सर्व बसेस दाखल होणार आहेत. असे सांगण्यात आले आहे. ST महामंडळाच्या बसेसचे होणार्व अपघात, गाड्यांचा होणारा तुटवडा तसेच होणारी प्रवश्यांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी यामुळे एसटी महामंडळ नवीन बसेससाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

कश्या असतील या बसेस?

एसटी महामंडळात दाखल झालेल्या 20 बसेस मध्ये एकूण 35 आसने आहेत. या मिडी बस असून ट्या वातानुकूलित आहेत. M/s Evey Trans प्रा. लि. या कंपनीने ई-बसेस एसटीला भाडेतत्त्वावर पुरवण्याचे कंत्राट घेतले आहे. त्यामुळे गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. तसेच त्याचे तिकीट दर ठरवण्यात येणार आहेत. त्यानंतर या गाड्या धावणार आहेत.