सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सोमवारपासून अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू होणार

shekhar singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा दि. 24 (जिमाका) : सध्यस्थितीत सातारा जिल्हयातील RT-PCR टेस्ट पॉझीटीव्हीटी रेट पाहता, सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असलेने शासन आदेश दि. 4 जून 2021 मधील सूचनेनुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 26 जुलै 2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केले आहे.

आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत
सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करणेत येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करणेत येत आहे.

सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक बाबीची दुकाने,आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल,औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल,औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल.

अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल.

ज्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवण्यास परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजलेनंतर व शनिवार, रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल. परंतु, हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी लॉजिंगसाठी अगोदर बुकींग करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल.