पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

lockdown
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू पुन्हा वाढू लागली असून आता डेल्टा प्लस या नवीन विषाणूने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका कडून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता पुणे महानगरपालिका क्षेत्रात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत हे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे

महापालिकेने जारी केलेल्या नियमानुसार पुण्यात अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील तर शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू राहील

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत

पुण्यातील मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णपणे बंद राहतील.

लग्न समारंभ कार्यक्रमास 50 लोकांची उपस्थिती राहील.

उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.