नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबंधींची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्नांमध्ये देखील घट होत आहे. यापूर्वी ४ लाखांवर असलेली संख्या आता १ लाखावर आली आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळतो आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आता केंद्र सरकार कडून लक्षणं नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत अँटिपायरेटीक आणि अँटिस्टीसिव वगळता इतर सर्व औषध बंद करण्यास सांगितले आहेत. याबाबत आरोग्य मंत्रालयाने एक गाईडलाईन जारी केली आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की लक्षणं नसलेल्या आणि हलकी लक्षण असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून देण्यात येणार्या औषधांमध्ये बदल करण्यात आला आहे.
‘ही’ औषधे केली बंद
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक, मल्टीविटामिन आणि बाकी औषधे बंद करण्यात आली आहेत. आता त्यांना केवळ तापासाठी अँटिपायरेटीक आणि सर्दीच्या लक्षणांसाठी अँटिस्टीसिव दिले जाईल. कोरोना वायरस ची लक्षणे असलेल्या रुग्णाने अँटिपायरेटीक आणि अँटिस्टीसिव औषध घ्यायला हवे. खोकल्यासाठी बुडसोनाईडच्या 800 mg औषधाचा डोस दिवसातून दोन वेळा आणि पाच दिवसांपर्यंत घ्यायला हवा.असे नव्या गाईडलाईनमध्ये सांगण्यात आले आहे.
काय आहेत नव्या गाईडलाईनमधील मुद्दे
— डॉक्टरांनी रुग्णांच्या अनावश्यक चाचण्या करू नयेत. यामध्ये सिटीस्कॅन सारख्या चाचण्यांचा समावेश आहे .
— कोरोनापासून वाचवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे
–जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याला फोन करून सल्ला घेण्याचा आणि पौष्टिक अन्न खाण्यास देखील सांगितले आहे.
–कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी फोनच्या माध्यमातून संपर्कात राहा आणि सकारात्मक चर्चा करण्यास देखील सांगितले आहे
–ज्या रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत त्यांच्यासाठी कोणतेही औषध सांगण्यात आलेले नाहीत. मात्र त्यांना इतर कोणताही आजार नसावा अशी अट आहे.
–ज्यांच्यामध्ये हलकी लक्षण आहे त्यांनी स्वतःच ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा ऑक्सिजन पातळी चेक करण्यास सांगितले आहे.