पुरावे आहेत म्हणून अटक झाली; DCP पाटील यांनी फेटाळला एकता कपूरचा दावा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निर्माती एकता कपूर हिच्या नागिन ३ मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी याला बलात्काराच्या आरोपाखाली पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. परंतु हे आरोप एकताने फेटाळले होते. इतकेच नव्हे तर तिने पार्लची बाजू घेत विनाकारण खोट्या प्रकरणात त्याला अडकवले जात आहे, असे उलट आरोप पीडित मुलीच्या वडिलांवर केले होते. याउपर तिने तिच्याकडे पुरावा असल्याचेही म्हटले होते. मात्र एकताचा हा दावा डीसीपी संजय कुमार पाटील यांनी फेटाळून लावला आहे. सोबत त्यांनी एकताला प्रत्युत्तर देत अभिनेत्या विरोधात ठोस पुरावा असल्याचा उलट दावा केला आहे आणि त्यामुळे पर्लच दोषी असल्याचे म्हटले आहे.

वृत्त माध्यमांशी बोलताना डीसीपी पाटील म्हणाले, “ही केस सर्वप्रथम वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिथून आता वालिव पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. आरोपीचे निवेदन घेण्यात आले आहे. आरोपी आणि पिडीत मुलीची आई एकाच शोमध्ये काम करत होते. त्या मुलीचे वय १२ वर्षाखाली आहे. एकताने केलेल्या दाव्यात तथ्य नाही. आमच्याकडे अभिनेत्या विरोधात ठोस पुरावे आहेत. हे सर्व पुरावे आम्ही लवकरच कोर्टात सादर करु. सध्या या प्रकरणावर आणखी चौकशी सुरु आहे.”

 

याविषयी बोलताना ऐकताने इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली होती. यात तिने म्हटले होते कि, “मुलींची छेडछाड करणाऱ्या किंवा त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या कलाकाराला माझ्या मालिकांमध्ये स्थान मिळत नाही. पण पर्ल मात्र निर्दोष आहे. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहे. माझं काल त्या मुलीच्या आईशी बोलणं झालं आहे. तिने मला स्पष्ट शब्दात सांगितले की, मुलीचे वडिल पर्लवर खोटे आरोप करत आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून त्यांनी एक मनाची कथा रचली आहे.” यातील लक्षवेधी बाब अशी कि, तरुणीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील एकताकडे आहे. अन् पुरावा म्हणून ती पोलिसांना देऊ शकते असा दावा तिने केला होता. मात्र तिचा हा कांगावा अर्थात दावा आता डीसीपी पाटील यांनी फेटाळून लावला आहे.

You might also like