मुंबई इंडियन्सकडून नव्या जर्सीचे अनावरण; पहा कशी दिसेल रोहितची पलटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  तब्बल पाच वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL च्या 2022 पूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून नव्या जर्सीचे अनावरण केलं.

मुंबईच्या जर्सी मध्ये फारसा बदल झालेला नाही. त्याला नवे प्रायोजक मिळाले. तसेच समोरच्या बाजूला काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. बाकी जर्सीचा रंग पूर्वीसारखा गडद निळा आहे. बाजूला सोनेरी पट्टे देखील निळ्या रंगाचे चांगले सूट होत आहेत . परिणामी, MI ची नवीन जर्सी डिझाइन काही वेळातच व्हायरल झाली आणि चाहत्यांनी वेगवेगळी मते मांडली.

दरम्यान, मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सार्वत यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने तब्बल ५ वेळा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरल आहे. यंदाही मुंबई इंडियन्स नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानात उतरून पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याचा प्रयत्न करेन