राज्यात संपूर्ण ऊस गाळपाशिवाय कारखाने बंद करू नये : बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात सध्या ऊस आज मोठ्या प्रमाणावर शेतात उभा आहे. ऊसाचे उत्पन्न वाढल्याने गाळपाचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस तसेच दुष्काळी भागात पाणी पोहचल्याने तरूण शेतकऱ्यांनी ऊसाचे चांगले उत्पादन काढले आहे. तरीही साखर आयुक्ताच्या मार्फत मी आढावा घेत आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय बंद न करण्याच्या सूचना दिल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या आहेत.

बाळासाहेब पाटील म्हणाले, अतिरिक्त ऊसाच्या बाबतीतला प्रश्न दर 5-6 वर्षांनी निर्माण होतो. कारण पट्टापद्धत, ड्रिप पध्दतीमुळे ऊसाचे चांगले उत्पन्न वाढले आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर आता उभा असलेला ऊस गाळपाचे मोठे आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे. मी सध्या सर्व राज्यातील आढावा घेत असून संपूर्ण ऊस गाळप झाला पाहिजे असे नियोजन सुरू आहे. चालूवर्षी हेक्टरी उत्पादनही वाढले आहे.

चालूवर्षी बीड, जालना, परभणी या तीन मराठवाड्यातील जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत. तर सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील सहकरी साखर कारखाना, प्रतापगड कारखाना आणि खंडाळा कारखाना हे सुरू न झाल्याने तेथे ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी अजूबाजूच्या परिसरातील कारखान्यांना ऊस गाळपाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जूना खानापूर या दुष्काळी भागात पाणी गेल्याने ऊस वाढला आहे. तरीही जोपर्यंत उभ्या ऊसाचे संपूर्ण गाळप होत नाही, तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत अशा सूचना कारखान्यांना केलेल्या असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment